अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या चौघांना अटक

Published on -

सोनई : नेवासा तालूक्यातील चांदा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या कारणावरून अहमदनगरजवळील नागापूर येथील चौघा आरोपींना सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे.

याबाबत पोलीस सूृत्रांकडून समजलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत सोनई पोलीस ठाण्यात २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल होता.

याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने नागापूर येथे शोध घेऊन चौघा आरोपींना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.

आरोपी सोनू राजू वाघमारे, सुनीता परशू कांबळे, छाया प्रभाकर पठारे, काजल लखन म्हात्रे (सर्व रा. नागापूर, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe