पाणी भरण्याच्या वादातून बेदम मारहाण

Published on -

नेवासा : नेवासा खुर्द परिसरात रहाणारे शेतकरी गोरख आजीनाथ जाधव (वय २७) या तरुणाचे दि. १२ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाणी भरण्यावरून झालेल्या वादाच्या कारणातून जमाव जमवून गज व काठ्यानेबेदम मारहाण करून डोके फोडले. हातावर मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

जखमी गोरख जाधव या शेतकऱ्यांने नेवासा पोलिसांत फिर्याद दिल्यावरून दामू पिराजी जाधव, सावळेराम दामू जाधव, अंबादास दामू जाधव, शिवाजी दामू जाधव, नंदू सोमा जाधव, हिराबाई दामू जाधव, सविता सावळेराम जाधव, राणी शिवाजी जाधव, मीराबाई अशोक धोत्रे (सर्व रा. नेवासा खुर्द) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News