नेवासे :- नेवासे तालुक्यातील गिडेगाव येथे ‘फोनवर किती बोलतेस?’ असे विचारल्याचा राग येऊन आईने मुलाचे तोंड दाबून त्याच्यावर चाकूने वार केले. यात मुलगा गंभीर जखमी झाला. मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला.
जखमी विशाल दीपक साळुंखे (१८) याने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची आई शोभा दीपक साळुंखे हिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पाेलिसांनी शाेभाला अटकही केली. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शोभा फोनवर बोलत होती. तिचा मुलगा विशाल म्हणाला, ‘किती वेळ फोनवर बोलतेस?’ त्यावर ‘मी कितीही वेळ बोलेन, तुला काय करायचे?’ असे आई रागाने म्हणाली.
त्यानंतर विशाल जेवण करून बाहेर अंगणात झोपला. मध्यरात्री दीडच्या सुमारास आईने त्याचे ताेंड दाबले. काही कळायच्या आत आईने हातातील चाकूने त्याच्या कानाखाली व तोंडावर वार केले.
विशालने हाताने चाकू धरण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या हातावरही तिने वार केला. ‘तुझ्यात किती बळ आहे ते पाहतेच,’ असे म्हणत आईने त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. विशालने कशी तरी सुटका करून घेतली.
- बिजनेसमधुन नोकरीपेक्षा जास्त कमाई होणार ! ‘हा’ बिजनेस सुरु करा आणि कमवा वर्षाकाठी 7 लाख रुपयांचा निव्वळ नफा, वाचा सविस्तर….
- 2 हजाराची नोट बंद केल्यानंतर RBI ने उचलले आणखी एक मोठे पाऊल, 500 च्या नोटांबाबत जारी केले सर्क्युलर
- गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ 3 बँका एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना देतात सर्वाधिक व्याज
- Maha Cabinet Meeting : अहिल्यानगरात दुष्काळाची आग, सरकारच्या मेजवानीला रंग : जनतेच्या तोंडाला पाणी नाही, मंत्र्यांच्या थाळीत मिष्टान्न!
- Ahilyanagar Politics : विखे – राजळे – कर्डीले – पाचपुतेंत रस्सीखेच ? भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावरून अहिल्यानगरमध्ये मोठा राजकीय ‘गेम’