अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेतून भरदिवसा अडीच लाख पळवले

Published on -

नेवासा :- शहरातील स्टेट बँकेतून भर दिवसा अडीच लाखाची रक्कम अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरुवारी दि.20 दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

ग्राहकाने जमा केलेली रक्कम कॅशीअरने भारतीय स्टेट बँक शाखेच्या काउंटरवरच ठेवल्याने दोन अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत या रकमेवर डल्ला मारला.

अल्पवयीन मुलाचा वापर करून स्टेट बँकेच्या नेवासे शाखेतून अडीच लाख रुपये पळवण्यात आले.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर स्पष्ट दिसत आहेत.वर्दळीच्या ठिकाणी ही बँक आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

स्टेट बँकेची ही शाखा भरवस्तीत असूनही तेथे सुरक्षारक्षक नेमलेला नाही. सुरक्षारक्षक नसल्यानेच पाळत ठेवून ही चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe