दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्यावर जागतिक मंचावर एकाकी पडलेल्या पाकच्या पंतप्रधान इम्रान खान यांची आदळआपट अजूनही सुरूच आहे. काश्मीर मुद्यावर मुस्लिम नेत्यांचे समर्थन मिळविण्यासाठी धडपड करत असलेल्या खान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या भारत दौऱ्यापूर्वी त्यांना अचानक फोन करत या मुद्यावर चर्चा केली.
शेख हसिना चार दिवसीय भारत दौऱ्यासाठी गुरुवारी नवी दिल्लीत दाखल झाल्या.भारताच्या दिशेने निघण्याच्या काही तास अगोदर पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शेख हसिना यांना अचानक फोन केला. काश्मीर मुद्यावरून खान यांनी हसिना यांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. जगभरातील विविध देशांनी या मुद्यावरून अनेक वेळा खान यांना सुनावलेले असताना सुद्घा ते सातत्याने काश्मिरी राग आळवत आहेत.

खान यांनी फोनवर बोलताना हसिना यांच्या प्रकृती आणि डोळ्यांची चौकशी केली. याबद्दल हसिना यांनी खान यांचे आभार मानले, अशी माहिती हसिना यांचे प्रेस सचिव एहसान उल करीम यांनी दिली. हसिना यांच्या डोळ्यांवर नुकतेच लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. गेल्या वर्षी सत्तेत आलेल्या खान यांनी प्रथमच हसिना यांच्यासोबत अशा प्रकारची चर्चा केली.
- अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचं काय होणार ? प्रशासन, राजकीय नेते आणि लोकांच्या भावना…
- IOB Apprentice Bharti 2025: इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत 750 रिक्त जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- पुण्यात तयार होत असलेल्या ‘या’ मेट्रोमार्गात मोठा बदल ! Metro Route मधील बदल पुणेकरांसाठी फायद्याचा की तोट्याचा ? पहा….
- Fortuner खरेदी करताय ? फक्त 5 लाखात घरी आणा फॉर्च्युनर ! 5 लाखाचे डाऊन पेमेंट केल्यास कितीचा EMI ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेतून मिळणार एका लाखाचे व्याज ! गुंतवणूकदारांचे पैसे 3 वर्षात होणार डबल