मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशच्या शामली जिल्ह्यात एका माकडाची गोळी झाडून हत्या केल्याप्रकरणी बंदूक परवाना असलेल्या एका व्यक्तीला रविवारी पोलिसांनी अटक केली.
झिंझाना पोलीस ठाणे हद्दीतील अबदान गावातील हाफिज अहमद नावाच्या व्यक्तीने शनिवारी एका माकडाची गोळी झाडून हत्या केली. संबंधित प्रकार निदर्शनास आल्यानंतर बजरंग दलाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने केली.
यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अहमदला अटक केली. यानंतर अहमदवर गुन्हा दाखल केला असून, त्याची बंदूक जप्त केल्याची माहिती यावेळी स्थानिक पोलिसांनी दिली.
- अनुसूचित जाती, नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टरवर ९०% अनुदान; फक्त ३५ हजारांत मिळणार ट्रॅक्टर
- मुख्याध्यापक व शिक्षकांसमोर दुहेरी कोंडी; सीटीईटी परीक्षा की निवडणूक कर्तव्य?
- प्रायव्हेट जेट बुक करणं सामान्य माणसालाही शक्य? जाणून घ्या खर्च, प्रक्रिया आणि वास्तव
- आयुष्मान भारत योजना : ७० वर्षांवरील नागरिकांना कसा मिळतो १० लाख रुपयांपर्यंत मोफत उपचारांचा लाभ?
- वारकऱ्यांच्या सोयीसाठी भुसावळ-पंढरपूर नियमित रेल्वेची जोरदार मागणी; कायमस्वरूपी एक्स्प्रेस कधी सुरू होणार?













