हिप्नोटाईज करून बलात्काराचा प्रयत्न !

Published on -

नवी दिल्ली :- हल्ली घरातली छोट्यातली छोटी वस्तु ही ऑनलाईन मागवली जाते. ऑनलाईन वस्तु खरेदी केल्यानंतर डिलिव्हरी बॉय घरपोच सामना पोहचवतात, त्यामुळं हा पर्याय लोकांना सोयिस्कर असतो. मात्र नवी दिल्लीत या ऑनलाईन डिलिव्हरीचा एक भयंकर प्रकार घडला आहे.

डिलिव्हरी बॉयनं सामना देताना चक्क महिलेला सम्मोहित केले. अॅमेझॉनवरून खरेदी केलेल्या वस्तु पोहचवण्यासाठी घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयनं महिलेला सम्मोहित केले आणि तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.

याच दरम्यान महिला शुद्धीवर आली, आणि तिनं त्याचा विरोध केला. त्यानंतर या महिलेनं डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. दरम्यान यासंदर्भात पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पिडीत महिलेनं केलेल्या आरोपात, अॅमेझॉनवरून काही दिवसांपूर्वी सामनाची खरेदी केली होती. मात्र त्यातील काही सामना परत पाठवायचे होते.

त्यासाठी भुपेंद्र पाल नामक डिलिव्हरी बॉय त्यांच्या घरी पोहचला. त्यावेळी त्यांच्यात सामनावरून वाद झाला. त्यानंतर पिडित महिलेनं कस्टमर केअरला फोन लगावत याबाबत माहिती दिली. त्यानंतर भुपेंद्र पाल तेथून निघून गेला, अशी प्राथमिक माहिती दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe