दैनिकाच्या संपादकावर आत्महत्येस प्रवूत्त करत असल्याचा महिलेकडून आरोप

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- वेळ होती शुक्रवारी ४.३० ची परंतु पत्रकार परिषद घेणारे ५ वाजले तरी, दिसेना, पत्रकार ही वाट पाहून निघणार तोच रुद्र अवतार धारण केलेली ती महिला थेट हाँटेलच्या प्रेस काँफरन्स हाँलमध्ये आली.

पाहातर काय शुक्रवाराची सांयकाळ वेगळीच झाली. चक्क त्या महिलेने एका मोठ्या दैनिकाच्या संपादकावरच दबाव आणून आत्महत्यास प्रवत्त करीत असल्याचा पत्रकार परिषदेत आरोप केला.

तसेच अन्य पत्रकारांसमोर त्या माननीय महोदय पत्रकाराची चांगलीच ग्रहणी त्या संबंधित रुद्र अवतार घेऊन आलेल्या महिलेने कथन केली.

अखेर ही बातमी छापावी की नाही, याबाबत काही सूज्ञ पत्रकारांंमध्ये पत्रकार परिषद झाल्यावर खमंग चर्चा झाली.

पण त्या संबंधित रुद्र अवतार धारण करणा-या महिलेवर खरंच अन्याय झाला असल्याचे तिच्या सांगण्यातून दिसून आले.

तशी ही बाब एखाद्या वर्तमान पत्राच्या माननीय महोदय पत्रकाराने करणे उचित नाही. संबंधित महिलेने त्या माननीय महोदय पत्रकारावरच का चिडली? का असे आरोप केलेत,

यात खोल वर जाण्याची गरज नाही असो. त्या महिलेला नोकरीवरून काढून टाका, असे त्या महिलेच्या वरिष्ठांना माननीय महोदय पत्रकाराने दूरध्वनी करून का सांगितले ?

पोलिस ठाण्यात माननीय महोदय पत्रकाराविरुद्धात तक्रार देण्यास ती महिला गेली असता, कसा दबाव टाकण्यात आला,

याबाबत त्या महिलेने पत्रकारासमोर घोषवाराच मांडला. यावेळी त्या महिलेने संबंधित माननीय महोदय पत्रकाराकडून कसा त्रास दिला जात आहे,

ते कथन करीत ती महिला म्हणाली की, ५ ते ६ वेळा मला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे त्या माननीय महोदय पत्रकाराने त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास

माझ्या आत्महत्येस व कुटुंब उध्वस्त करण्यास ते माननीय महोदय पत्रकाराच जबाबदार असेल, असे त्या महिलेने उपस्थित पत्रकारांना सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment