ग्रीन टी एक उत्तम प्रकारचे अँटी-ऑक्सिडेंट समजले जाते. मात्र हल्लीच झालेल्या अध्ययनातून त्याच्याबाबत एक नवीन खुलासा झाला आहे. समजा आयर्न म्हणजे लोहयुक्त भोजनानंतर ग्रीन टीचे सेवन केले तर त्याचा प्रभाव कमी होतो, असे त्यात म्हटले आहे.
पालकासारख्या कगाही हिरव्या भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह असते. अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी हे अध्ययन केले असून त्यात एका भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाचाही समावेश आहे.
शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, ग्रीन टीमध्ये जे महत्वाचे संयुग असते. ते लोहासोबत जोडले जाते. त्यामुळे समजा ग्रीन टी लोहयुक्त खाद्यपदार्थासोबत घेतला तर त्याचा अँटी-ऑक्सिडेंटचा गुणधर्म नष्ट होतो. जे लोक ग्रीन टीचे सेवन त्याचे लाभ लक्षात घेऊन करतात, त्यांच्यासाठी हे निष्कर्ष जास्त महत्त्वपूर्ण आहेत.
याशिवाय ताप वा आरोग्याशी संबंधित अन्य समस्यांंच्या उपचारासाठी ग्रीन टी पिणाऱ्या लोकांनीही ही गोष्ट लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.