अहमदनगर :- मामाच्या मुलीवरून दोघा सख्या भावांमध्ये मारहाण झाली. एका भावाने दुसऱ्या भावाच्या डोक्यात काचेची बाटली मारून जखमी केले.
नगर शहरातील सिद्धार्थनगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस स्टेशनला मारहाण करणे, शिवीगाळ करून दमदाटी करणे या कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

यात बाळू राजू कांबळे जखमी झाला असून, त्याच्या फिर्यादीवरून गणेश राजू कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मामाच्या मुलीशी मला लग्न करायचे आहे. तुझे लग्न झाले असून, तू मुलीला का फितवतो, असे बाळू गणेशला म्हणाला. त्यातून दोघांमध्ये भांडणे झाले.
त्यातून गणेश याने रागाच्या भरात घरातील काचेची बाटली उचलून बाळूच्या डोक्यात मारली व ‘मी मामाच्या मुलीसोबत दुसरे लग्न करणार आहे,’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.