अहमदनगर – दैनिक भास्कर पेपरचे जिल्हा प्रतिनिधी उमेश दारुणकर यांना मंगळवार (दि.१३) दुपारी रेल्वेने जोराची धडक दिल्याने या अपघातात ते जागीच ठार झाले. अद्याप अपघाताचे कारण समजू शकले नाही.
पत्रकार उमेश दारुणकर गेली 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात होते. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये विविध वृत्त वाहिन्यांना काम केल्यानंतर गेल्या तीन वर्षांपासून ते दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होते.
आज दुपारी साडेतीन चार वाजण्याच्या दरम्यान त्यांनी नगर-कल्याण रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज खालून जात असताना गोवा एक्सप्रेसने उडविले. तोंडावरून रेल्वेचा चाक गेल्याने त्यांचा चेहरा ओळखू येत नव्हता. ओळखपत्रावरून त्यांची ओळख पटली.
- भारतात कोणत्या राज्यात धावतात सर्वाधिक ट्रेन, कमाईच्या बाबतीत कोण देतं सर्वाधिक उत्पन्न? वाचा स्पेशल रिपोर्ट!
- एखादं गाव वसवता येईल इतकं मोठं…’हे’ आहे भारताचं सर्वात मोठं विमानतळ! पाहा खास वैशिष्ट्यं
- मंगळवारी आणि शनिवारी करा हनुमान चालीसा पठन, बजरंगबलीच्या कृपेने सर्व संकट होतील दूर!
- संगमनेरमधील रायते गावच्या सरपंचाने अतिक्रमण केल्यामुळे सरपंचपद रद्द, जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
- महाराष्ट्रात एक-दोन नाही तब्बल 12 सुपरफास्ट रेल्वे मार्ग तयार होणार ! रेल्वे मंत्रालयाकडून 16,241 कोटी रुपये मंजूर