नवी दिल्ली : हिंदू तरुणीशी विवाह केल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कुटुंबात स्विकार करावा यासाठी धर्मांतर करणाऱ्या तरुणाविषयी शंका घेत पित्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही परंतू तरुणाने मनापासून तरुणीचा स्विकार केला असेल तर तरुणीच्या कुटुंबियांनीही त्याला स्विकारायला हवे असा सल्ला देत धर्मांतर करणाऱ्या तरुणाला आयुष्याभरासाठी सुयोग्य पती बन असा मौलिक सल्ला दिला.
छत्तीसगडमधल्या तरुणीने मुस्लिम तरुणाशी आर्य समाज पध्दतीने विवाह केला. त्यानंतर तरुणाने कायदेशीर मार्गाचा अवलंब करुन धर्मांतर केले. तरुणीच्या कुटुंबियांनी आपला स्विकार करावा यासाठी त्याने धर्मांतर केले. त्यानंतरही तरुणीच्या कुटुंबियांच्या त्याच्या निष्ठे विषयी संशय वाटत होता. हिंदू तरुणींना फसवण्यासाठी हा सापळा असल्याचे तरुणीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यासाठी तरुणीच्या वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाचे न्या. अरुण मिश्रा यांनी, ‘समाज व्यवस्था आंतरजातीय किंवा आंतरधर्मिय विवाहाविरोधात नाही . सर्वांना तरुणीच्या भवितव्याची काळजी आहे.’ यावर तरुणीच्या पित्याच्या वकिलांनी हिंदू तरुणींना फसवण्यासाठी हा सापळा असल्याचे सांगितले. न्यायालयाने तरुणाला ओळख दर्शवणारी कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. ती तपासल्यानंतर त्याला, ‘आयुष्याभरासाठी सुयोग्य आणि एकनिष्ठ पती बन आणि चांगला प्रियकर बनून रहा’ असा सल्ला दिला.
- Share Market Crash : शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, निफ्टीने २९ वर्षांचा विक्रम मोडला!
- Vivo T4x 5G : 6500mAh बॅटरी आणि जबरदस्त फीचर्ससह बजेटमध्ये येणार ! किंमत आणि फीचर्स पहाच…
- Best SUV Cars India : तुमच्या बजेटमध्ये बेस्ट SUV कोणती? ८ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या ४ सर्वोत्तम कार्स
- Kia PV5 Electric Van लाँच, एकदा चार्ज केल्यावर जाईल पुणे ते मुंबई दोनदा ….
- Best Diesel Cars : ह्या आहेत भारतातील सर्वात स्वस्त डिझेल कार्स किंमत सुरु होते फक्त सात लाखांत…