डॉ.नीलम गोऱ्हे यांचा संक्षिप्त जीवन परिचय

Ahmednagarlive24
Published:

नाव : डॉ.नीलम दिवाकर गोऱ्हे

शिक्षण : बी. एस. ए. एम. (मुंबई विद्यापीठ – पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय), १९९२ बँकॉक येथील एशियन लोकविकास संस्थेत प्रशिक्षण विषयक डिप्लोमा.

ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी

अपत्ये : एकूण १ (१ मुलगी)

व्यवसाय :  वैद्यकीय / सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदारसंघ – महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निर्वाचित

इतर माहिती : सध्याचे राजकीय पदे  – शिवसेना प्रतोद (विधानपरिषद), शिवसेना प्रवक्ता व उपनेत्या,

वैधानिक भूषविले पदे- उपसभापती – महाराष्ट्र विधानपरिषद, मुंबई (जून, २०१९ ते एप्रिल, २०२०)

संस्थापिका –

· अध्यक्षा, स्त्री आधार केंद्र व क्रांतिकारी महिला संघटना, पुणे

सामाजिक :-

· पंचायत राज, महिला विकास, स्त्रियांवर होणारे अत्याचार या विषयांवर १००० च्यावर व्याख्याने दिली.

· हुंडा, सामाजिक विषमता, महिला सक्षमीकरण, महिला संघटन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन.

· १९९३ लातूर – उस्मानाबाद व २००० गुजरात येथील भूकंपग्रस्तांना तसेच, १९९३ मुंबई येथील बॉम्बस्फोटातील कुटुंबियांना मदतकार्य :

नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत मदत कार्य : – पूरग्रस्त तसेच २००६  साली मुंबई बॉम्बस्फोटानंतर नेपाळी कुटुंबियांना मदतकार्य

· १९९० ते १९९१ चित्रपट परीक्षण मंडळावर सदस्य म्हणून कार्य :

· १९९३ ते १९९४ नाट्यपरीक्षण मंडळावर कार्य. : पथनाट्य लेखन, महिलाविषयक चित्रपट, नाटके यावरील समीक्षा : पाश्चात्य नाट्यकृती व कविता गायन कार्यक्रमाचे आयोजन :

· १९९९ ते २००० अध्यक्षा, महिला आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्याच्या १९९४, १९९८, २००१ व २००३ च्या महिला धोरण निर्मितीत सहभाग

· १९९२ – १९९३ सदस्या, भारतीय लोकविकास कार्यक्रम

· १९९३ ते ९५ सदस्या – महाराष्ट्र राज्य महिला आयोग

· १९९८ सदस्या, पर्यावरण संतुलन व संरक्षण समिती, भारत सरकार

· १९९४ ते १९९५ सदस्या, हुंडानिर्मुलन समिती व कायदा सहाय्य समिती

· १९९२ – १९९८ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या निमंत्रक

· २००० पासून पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख, शिवसेना महिला आघाडी : स्त्री मतदारांच्या जाहीरनामा कार्यक्रमात सहभाग, शिवसेनेच्या सर्व आंदोलनात सहभाग : शिवसेना – भाजप वचननामा २००४ च्या समितीच्या सदस्या

· २००४ सिनेट सदस्या, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर :

· २०१६-१८  सिनेट सदस्या, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ  :

· २०१० ते २०१४ पर्यंत शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्कनेत्या :

२००७ ते २०१८ शिवसेना प्रवक्त्या

कामाचा मुख्य विषय : महाराष्ट्रातील ५००० पेक्षा अधिक कुटुंबे व महिलांना कायदेशीर मदत, सल्ला मार्गदर्शन, समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात पुढाकार, घरगुती हिंसाचार, बलात्कार, छळ अशा विषयांमध्ये महिलांच्या मदत गटांची स्थापना. स्त्री आधार केंद्रामार्फत न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि सक्रिय सहकार्य.

राजकीय प्रवास :

कट्टर शिवसैनिक म्हणून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आदी भागात कार्यरत. २०१५ पासून विधानपरिषदेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद म्हणून कार्यरत.

शिवसेना उपनेत्या २००५

शिवसेना प्रवक्त्या — २००७

शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख- २०१०

सन २००७ ते आजतागायत (२०२०) पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून सामाजिक न्याय, राजकिय भूमिका विषयांवर कार्य व मराठी, हिंदी, इंग्रजी वाहिन्यांवर सामाजिक विषयांवर ६००० चर्चासत्रात सहभाग.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सन्माननीय सदस्य म्हणून तीन वेळा कार्यकाळ भूषविण्यात आला.

(२००२ – २००८, २००८ ते २०१४, २०१४ ते आजपर्यंत)

शिवसेना स्टार प्रचारक – १९९९, २००५, २००९, २०१४

विधान परिषदेच्या महिलाविषयक विविध समित्यांवर विविध पदांवर काम :

· बीड येथील अवैध शस्त्रक्रिया करुन महिलांची गर्भपिशवी काढणाऱ्या प्रकरणाची चौकशी समितीच्या अध्यक्षा

· महिला सबलीकरण समिती सदस्या

· पंचायत राज समिती, ग्रामीण विकास समिती सदस्यत्व

· भारताकरिता महिला धोरण ठरविण्याकरिता संयुक्त राष्ट्र संघाच्या आर्थिक व सामाजिक परिषदेच्या सहकार्याने प्रयत्न.

· महाराष्ट्रातील विविध महिलाविषयक कायद्यात आवश्यक ते बदल सुचविण्यात महत्त्वाची भूमिका.

विधान परिषदेतील विविध समित्यांवर काम :

· २००२ -२००८ सदस्या, महाराष्ट्र विधान परिषद : विधी मंडळाच्या महिला तदर्थ समिती, आश्वासन समिती, महिलांचे हक्क व कल्याण समिती, पंचायत राज समिती, ग्राम विकास समिती व २०१४ पूर्वी अल्पसंख्यांक समितीच्या सदस्या,

· विशेष हक्क समिती प्रमुख २०१५ ते २०१८ कार्यरत

· अंदाज समिती – २०१० – २०१३ ते २०१८

· आश्वासन समिती २००४-२००८

· एच आय व्ही / एड्स जनजागृती समिती – २०१३-१४

· कामकाज सल्लागार समिती – २०१३-१८

· गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायदा समिती सदस्य २०१५-१८

· महिलांच्या सुरक्षाविषयक आय टी समिती २०१७-१८

विविध प्रकारच्या संपर्क क्षेत्राशी समन्वय –

जनसाथी दुष्काळ निवारण मंचच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शेतकरी व ग्रामीण भागातील शेतकरी, महिला यांच्याकरिता रोजगार विषयक कार्य, शासनाकडे पाठपुरावा आंतरराष्ट्रीय पातळीवरील डेव्हलपमेंट सपोर्ट टीमच्या स्व मदत गट आणि मुलांच्या हक्क विषयक परिषदेत सहभाग.

· खाण कामगार संदर्भात काम

· आदिवासीकरिता विदर्भ विकास मंचच्या माध्यमातून संयुक्त वनीकरण कार्यक्रमाबाबत जागृती २०१२ – २०१५

· महिलांकरिता निर्भया मोहिमेच्या माध्यमातून काम २०१० ते २०१४

· एशिया पसिफिक फोरम मध्ये सहभाग २००२-२००६

मानवी हक्क क्षेत्रातील काम :

महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी महिलांच्या कायद्याविषयी संवेदनशीलता वाढविण्याच्या हेतूने १०० पेक्षा अधिक कृतीसत्रांचे आयोजन

महिला न्यायाधीशाच्याकरिता संवेदनशीलता वाढवून लवकर निकाल लागावेत यासाठी युएनडीपी आयोजित परिषदेत सहभाग  २०१६

महाराष्ट्रातील दुर्गम आणि मागास क्षेत्रात सामाजिक बांधिलकी म्हणून १९८१ ते १९९२ या काळात वैद्यकीय सेवाकार्य

· वैद्यकीय सामाजिक कार्यातील या कामाने समाज कार्याला सुरुवात

· भूमिहीन मजुरांच्या हक्कासाठी समाजात काम – १९८५-९४

·  दलित आणि भटक्या जमातीसाठी विकास चळवळीत काम

· रोजगार हमी योजना, दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलांसाठी धोरण ठरविण्यात मागील ३५ वर्षांपासून सहभाग

· महिला व मुलींच्या अनैतिक व्यापार क्षेत्रात मुलींच्या संरक्षणात कायदेशीर मदत व आधार देण्याचे काम

· मुस्लिम महिलांमधील अल्प वयात लग्न आणि तोंडी तलाक देण्याच्या विषयावर राष्ट्रीय पातळीवर कार्यशाळेचे आयोजन

· दलित अत्याचार व महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडित कुटुंबाना प्रत्यक्ष भेटी देऊन आधार देण्याचे काम अव्याहतपणे सुरु. राज्य शासनाकडे अशा कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आग्रह.

· लातूर परिसरातील भूकंपग्रस्त महिलांसाठी विशेष कार्य १९९३ ते आजतागायत २६ वर्ष

· विकलांग व दुर्बल व्यक्तीसंदर्भात अनेक काम करणाऱ्या सामाजिक संस्थांशी संलग्नता. अंध, श्रवणदोष, विशेष मुलींच्या शाळा, आदिवासी मुलींच्या आश्रमशाळा  अशा अनेक संस्थांशी सातत्याने काम.

· हुंडाबळी, घटस्फोट, पोटगी, बलात्कार कायदा, हिंदू विवाह कायदा, गर्भपात कायदा, द्विभार्या प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा, गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायदा, समान वेतन कायदा अशा अनेक विषयांवर १९९३ ते २०१० या काळात अनेक परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद यांचे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आयोजन.

·  नाओ या ख्यातनाम आंतरराष्ट्रीय संस्थेच्या उपक्रमात सातत्याने सहभाग १९९६ – २०००

ट्रान्स एशियन चेम्बर ऑफ कॉमर्सच्या महिला सक्षमीकरण विभागाच्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत

· स्त्री आधार केंद्राच्या वतीने ट्रान्स एशियन चेम्बर ऑफ कॉमर्ससोबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विषयावर मुंबईमध्ये कार्यशाळा २००६

· ४४ देशांच्या प्रतिनिधींची उदयपुर राजस्थान येथे आरोग्य व प्रजनन हक्काविषयी आंतरराष्ट्रीय कार्यशाळा आयोजन. एक थांबा तक्रार निवारण केंद्राची संकल्पना रचना व सादरीकरण १९९८.

राष्ट्रकुल संसदीय दौरा- चीन, युरोप, ऑस्ट्रेलिया

 लेखन व प्रकाशन :

साहित्यिक वारसा राज्य कवी चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे यांचा परिवार वारसा

श्रीमती लतिका दिवाकर गोऱ्हे (देशपांडे) यांच्या घराण्याचा कवी श्रीधर यांचा वारसा.  त्याचबरोबर सासरे विंदा करंदीकर यांच्याकडून साहित्यिक वारसा मिळाला. साहित्य समीक्षा विषयाची आवड, कथासंग्रह व विविध वृत्तपत्रातून लिखाण.

‘उरल्या कहाण्या’ हा कथासंग्रह व ‘नारीपर्व’, ‘माणूसपणाच्या वाटेवर’, ‘महिला आणि समाज’, ‘एक प्रवास संघर्षाचा’, ‘महाराष्ट्राच्या महिलांचा कायदेविषयक दर्जा’, ‘पीडीत महिलाओ की सहेली’, ‘आम्ही स्त्रिया’ या दिवाळी अंकांचे संपादन : ‘पोलीस मार्गदर्शक’, ‘स्त्रिया समान  भागीदार’, ‘कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा’, ‘वेध स्त्री प्रश्नांचा’, ‘

. विधानपरिषद माझे कामकाज’ – माझा सहभाग – कालखंड; सन २००२  ते २००७

. विधानपरिषद माझे कामकाज’ – कायदा –सुव्यवस्था या विषयावरच्या कामकाज विषयांवर; सन २००२ ते २०१३

. विधानपरिषद माझे कामकाज’ – माझा सहभाग – कालखंड; सन २००७ ते २०१३

. ‘शिवसेनेतील माझी २० वर्ष’

इ. पुस्तकांचे लेखन : ‘पूर्वा मुलींच्या अधिकाराची’, ‘महिला मंडळ मार्गदर्शक’, ‘अन्यायग्रस्त महिलांची मैत्रीण’, ‘पंचायत राज मार्गदर्शक’, ‘महिला विकासाची एकाकी वाटचाल’, ‘महिला विकासाची जागतिक कृती रूपरेषा’, ‘ स्त्री आरोग्याची कुळकथा’, ‘स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग’, ‘स्त्रिया व कायदा’, ‘आरोग्यातून विकासाकडे’, ‘शरीराची ओळख’,

‘महिला संबंधी धोरण (१९९४) : स्वयंसिद्धतेकडे वाटचाल’,  ‘नव्या शतकासाठी महिला धोरणे व अंमलबजावणी’ आणि ‘भिंतीमागचा आक्रोश’ या पुस्तकांचे संपादन.

तसेच, ‘Wail behind the wall’, legal status of women in Maharashtra’, ‘Women in Decision Making’,  ‘A lonely path to Development’,  ‘Girl child in oblivion’ या इंग्रजी पुस्तकांचे संशोधन व संपादन तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये महिलाविषयक लेखांचे सतत लेखन करून समाज जागृतीचे कार्य.

 पुरस्कार :

· ‘उरल्या कहाण्या’ या कथा संग्रहास १९९० चा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार प्राप्त

· १९९४ मध्ये सर्वोत्कृष्ट कथेला किर्लोस्कर पारितोषिक प्राप्त

· शशिकला जाधव उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार प्राप्त

· १९९९ मुंबई महानगर पालिकेतर्फे उत्कृष्ट समाजसेविका पुरस्कार प्राप्त.

· राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे दिनांक ५ जुलै २००९ रोजी भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “ उत्कृष्ट भाषण” पुरस्कार प्राप्त :

· आयकॉन फौंडेशन नासिक यांचा पुरस्कार २०१५

दै. नवशक्ती यांचा जीवनगौरव पुरस्कार २०१६

दै. लोकमत यांचा उत्कृष्ट महिला आमदार पुरस्कार २०१६

· सार्वजनिक वाचनालय, नाशिक यांचा कार्यक्षम आमदार पुरस्कार २०१७

परदेश प्रवास : १९९० मध्ये स्वीडन व २००० मध्ये ऑस्ट्रिया येथील संशोधन संस्थात प्रबंधाचे वाचन :

१९९६ ते २००१, २००७ ते २०१०, २०१५ ते २०१८ न्यूयॉर्क येथील जागतिक महिला आयोगाच्या चर्चासत्रात १६ वर्षे सहभाग :

१९९५ बीजिंग येथील चौथ्या विश्व महिला संमेलनात सहभाग : बँकॉक येथील महिला विकास परिषदेत सहभाग : नेपाळ, बांगलादेशचा अभ्यास दौरा,

आशियाईं पसिफिक एन जी ओ फोरम बीजिंग २००४ बँकॉक येथील बैठकीत सहभाग :

सपत या दक्षिण आशियाई व्यासपिठाच्या निमंत्रक.

महाराष्ट्र विधीमंडळाच्या ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, चीन, स्वीडन, रशिया, ईंग्लड, फिनलंड, स्विट्झर्लंड, डेन्मार्क संसदिय अभ्यास दौऱ्यात सहभाग

छंद : लेखन, वाचन व महिलाविषयक कार्य.

पत्ता : (१) सिल्व्हर रॉक्स, हरेकृष्ण मंदिर मार्ग, मॉडेल कॉलनी, पुणे ४११०१६

दूरध्वनी : ०२० – २५६५२१७२, २४२२५७४८.

मोबाईल : ९८२२०२२१५५  स्वीय सहाय्यक : ९०२८३३३३०५/०६ (योगेश)

Email Id:- [email protected],

वेबसाईट :- www.neelamgorheshivsena.org

(2)  विधानभवन, शिवसेना पक्ष कार्यालय, तिसरा मजला, फ्री प्रेस जर्नल मार्ग, मुंबई ३२

(सोमवार ते बुधवार)    (सकाळी ११ ते दुपारी ३)

(३) शिवालय, शिवसेना राज्य संपर्क कार्यालय, (दुपारी ४ ते ६)

बंगला क्रमांक सी 4, मंत्रालयासमोर, मुंबई ३२ (सोमवार ते बुधवार)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment