अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांनी गुरुवारी मुंबईहून नगरला आल्यानंतर आधी शिवसेनेचे शहराचे माजी आमदार अनिल राठोड यांची भेट घेतली.
राठोड यांचा दोन दिवसांपूर्वी वाढदिवस झाला असल्याने त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो, असे विखेंकडून स्पष्ट करण्यात आले व त्याला राठोडांनीही दुजोरा दिला.
राठोडांच्या घरी गेल्यानंतर डॉ. विखेंना घेऊन राठोड गांधी मैदानाजवळील लक्ष्मीबाई चौकात आले. तेथे शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सुभाष लोंढे, योगीराज गाडे,

श्याम नळकांडे, गणेश कवडे तसेच संभाजी कदम, सुरेश तिवारी, विक्रम राठोड, भगवान फुलसौंदर, धनंजय जाधव, जयंत येलुलकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
चहाचा आस्वाद घेत सर्वांचे गप्पाष्टक व हास्यविनोद रंगला. या वेळी राठोड व विखेंसमवेत सेल्फी घेण्याची अनेकांची लगबग सुरू होती.