टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरून जाणाऱ्या प्राचार्यांचा मृत्यू.

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- कांद्याने भरलेल्या टेम्पोने जोराची धडक बसून दुचाकीवरून जाणाऱ्या प्राचार्यांचा जागीच मृत्यू झाला.

नगर-कल्याण रस्त्यावरील जखणगाव शिवारात गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता हा अपघात झाला.

शिवाजीराव अभिनव (पाइपलाइन रस्ता, नगर) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या टाकळी ढोकेश्वर येथील श्रीढोकेश्वर विद्यालयात प्राचार्य होते.

गुरुवार सकाळी प्राचार्य शिवाजीराव अभिनव हे दुचाकीवरून नगर येथून टाकळी ढोकेश्वरकडे चालले होते.

नगर शहराच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कांद्याने भरलेल्या टेम्पोची त्यांच्या मोटारसायकलीला जोराची धडक बसली.

या धडकेत अभिनव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment