सिडनी : वयाच्या चाळीशीआधी वजन वाढणे वा लठ्ठपणामुळे होणारे विविध प्रकारचे कर्करोग वाढण्याचा धोका वाढतो, असा इशारा एका ताज्या अध्ययनातून देण्यात आला आहे. ४० वर्षाच्या वयापूर्वी वजन वाढल्यामुळे गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता ७० टक्के, किडनीच्या कर्करोगाची ५८ टक्के आणि आतड्याच्या कर्करोगाची शक्यता २९ टक्क्यांनी वाढते.
वाढत्या वजनामुळे स्री आणि पुरुष दोघांमध्ये लठ्ठपणाशी संबंधित कर्करोग होण्याची शक्यता १५ टक्के वाढते, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. त्यांनी तीन वर्षांच्या कालावधीत वेगवेगळ्या वेळी प्रौढ व्यक्तींचे दोन व त्याहून जास्तवेळा वजन मोजले. त्यात त्यांना कर्करोग होण्याच्या शक्यतेच्या आधीच्या वजनाचाही समावेश होता. कर्करोगाशी संबंधित चयापचय घटकांची तपासणी करण्यासाठी २००६मध्ये सुरू झालेल्या या अध्ययनात २.२० लाख लोकांच्या माहितीचा वापर करण्यात आला.
अध्ययनादरम्यान ज्या २७ हजार ८८१ लोकांना कर्करोग झाल्याचे दिसून आले, त्यांच्यातील ९ हजार ७६१ (३५ टक्के) लठ्ठपणाने ग्रस्त होते. शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, सामान्य बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांच्या तुलनेत पहिल्या व दुसऱ्या आरोग्य चाचणीत ३०पेक्षा जास्त बॉडी मास इंडेक्स असलेल्या लोकांशी संबंधित कर्करोग विकसित होण्याचा धोका सर्वाधिक होता.
- Penny Stocks 2025 : 1 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान तेजी, गुंतवणूकदारांची मोठी कमाई …
- Oneplus Open Offer : वनप्लसचा फोल्डेबल मोबाईल झाला स्वस्त ! तब्बल चाळीस हजार…
- जिओ फायनान्शिअलच्या शेअरबद्दल महत्वाची अपडेट ! शेअर लवकरच ₹300 च्या वर…
- iPhone वापरणाऱ्यांसाठी खास माहिती ! वाचा ‘i’चा अर्थ काय होतो ?
- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! PM Kisan Yojana नियमांमध्ये बदल होणार