अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात गुन्हा

Ahmednagarlive24
Published:

हाजीपूर : बिहारच्या नागरिकांविषयी अवमानास्पद विधान केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात येथील एका न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘बिहारचे नागरिक ५०० रुपयांचे तिकीट काढून रेल्वेने दिल्लीला येतात व ५ लाख रुपयांचा मोफत उपचार करवून परत बिहारला निघून जातात,’ असे वादग्रस्त विधान अरविंद केजरीवाल यांनी नुकतेच केले होते.

त्यांच्या या विधानाप्रकरणी नितीश कुमार नामक एका सामाजिक कार्यकत्र्याने शुक्रवारी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी प्रेमचंद्र वर्मा यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार आता पुढील सुनावणीसाठी न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे वर्ग करण्यात आली आहे.

‘केजरीवाल यांच्या विधानामुळे आपले मन दुखावले गेले,’ असे कुमार यांनी आपल्या तक्रारीत म्हटल्याचे त्यांचे वकील सुरेंद्रकुमार भारती यांनी सांगितले आहे. ‘दिल्लीच्या मुख्यमंर्त्यांचे विधान अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे.

त्यांनी आपल्या वक्तव्यातून देश व राज्यातील शांतता, एकोपा, अखंडत्व व सुसंवाद बिघडविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात कायद्यानुसार कारवाई केली जाईल,’ असे कुमार यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment