मुंबई – भाजप प्रवेशानंतर वडिलांशी फोनवर बोलणे झाल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट करतानाच, जे काही करशील ते सांभाळून कर असा वडील म्हणून त्यांनी मला सल्ला दिला. ते माझ्या प्रचाराला येणार नाहीत याचे दु:ख असल्याचेही सुजय विखे म्हणाले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाने त्यांना नगरमधून खासदारकीचे आश्वासनही दिले आहे. वडिलांच्या विरोधात जाऊन आपल्याला निर्णय घ्यावा लागल्याचे सुजय यांनी सांगितले.
माझ्या वडिलांच्या इच्छेविरोधात जाऊन मला हा निर्णय घ्यावा लागला. भाजपात येण्याची ही भूमिका ही माझी वैयक्तिक भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते.
वडिलांसोबत काही बोलणे झाले नसल्याचेही त्यांनी सांगितले होते. पण आता वडिलांनी फोन करून आपल्याला सल्ला दिल्याचे सुजय विखे यांनी सांगितले. सुजय यांच्या भाजपा प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांना कोंडीत धरण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.