कोपरगाव :- पुणे-धुळे एसटी बस (एमएच १४ बीटी ३२९०) धुळ्याकडे जात असताना एकाने स्वीफ्ट डिझायर कार (एमएच १७ बीव्ही ९६९१) आडवी लावून माझ्या मावस बहिणीला सावळविहीर येथे का उतरवले नाही? असे म्हणत बसचालकास मारहाण व शिवीगाळ केली.
नगर-मनमाड महामार्गावर तीनचारी येथे गुरूवारी दुपारी १ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
बसचालक नाकाडे आजिनाथ माने (पिंपळवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी स्विफ्ट कारचालक संदीप गणेश विघे (सावळविहीर) व कविता विनोद हुसळे (संगमनेर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ