अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Published on -

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.

याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.

नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.

जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe