बंगलूरु : डोकेदुखी असह्य झाल्याने ती शमवण्यासाठी १५ गोळ्या खाल्ल्याने गृहीणीचा मृत्यू झाल्याची घटना बंगलूरुत घडली आहे. या गोळ्यांमुळे तीने दोन दिवस मृत्यूशी झुंज देत होती. मुनाप्पा हा पत्नी सुमन्न्मा आणि मुलीसोबत अनेकल पोलिस ठाण्याच्या हद्दीत रहातो.
सुमन्न्माला डोकेदुखीचा त्रास आहे. तिच्यावर उपचार सुरु होेते. डोकेदुखी असल्यास वेदनाशमक गोळ्या तिला डॉक्टरने दिल्या होत्या. चार दिवसांपूर्वी तिला असह्य डोकेदुखी जाणवू लागली. तीने एकापाठोपाठ एक अशा १५ गोळ्या खाल्ल्या.

परंतू त्यामुळे डोकेदुखी थांबण्याऐवजी ती बेशुध्द पडली. मुलगी शोभाने तिला दवाखान्यात नेले. तिथून तिला व्हिक्टोरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवस मृत्यूशी झगडा दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे.
- स्वेटर नाही आता रेनकोट घालावा लागेल, आज आणि उद्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता !
- वाईट काळ संपला ! 15 जानेवारी 2026 पासून ‘या’ राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ, सर्वच क्षेत्रात मिळणार यश
- लखपती बनवणारा फंड ! 10 लाखाचे झाले 65 लाख, ‘या’ Mutual Fund ने गुंतवणूकदारांना बनवले श्रीमंत
- शिपाई ते IAS, IPS अधिकारी ; नव्या वेतन आयोगात कोणाचा पगार किती वाढणार ? समोर आली नवीन अपडेट
- 1 जानेवारी 2026 पासून ‘हे’ 6 नियम चेंज होणार ! सर्वसामान्यांवर काय परिणाम होणार ?