अहमदनगर ;- विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निमगाव वाघा (ता. नगर) येथे मतदारांचे स्वाक्षरी अभियान राबवून मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. होय, मी मतदान करणार या आशयाखाली हे अभियान राबविण्यात आले असून, या अभियानाच्या माध्यमातून लोकशाहीचा बाळगू अभिमान, चला आपण करुया मतदानचा संदेश देण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि.18 ऑक्टोबर) निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालय व आठवडे बाजार येथे मतदार जागृतीसाठी हे स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. आमचा संकल्प 100 टक्के मतदानाचा घोषवाक्याचा फलक लावून मतदारांच्या त्याच्यावर स्वाक्षर्या घेण्यात आल्या.

यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, प्र.मुख्याध्यापक किसन वाबळे, रावसाहेब सोबले, काशीनाथ पळसकर, पांडूरंग सोबले, दत्तात्रय जाधव, सतीश सोबले, चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, शिवप्रसाद औटी, उत्तम कांडेकर, दत्तात्रय पवार, निळकंठ वाघमारे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधानसभेसाठी दि.21 ऑक्टोबरला मतदान होत असून, सदर संस्थेच्या वतीने मतदार जागृती अभियान राबविण्यात येत आहे. संस्थेने विविध उपक्रम राबविले असून, ग्रामीण भागात मतदारांचा या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सार्वत्रिक निवडणुकित आपल्या कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाची टक्केवारी वाढविण्याची गरज असून, शंभर टक्के मतदान झाल्यास खर्या अर्थाने सक्षम लोकप्रतिनिधी निवडून येणार असल्याची भावना पै.नाना डोंगरे यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी जितेंद्र पाटील, निवडणुक विभाग तहसीलदार डॉ.चंद्रकांत शितोळे, स्वीप नोडल अधिकारी दिलीप थोरे, शिक्षणाधिकारी प्राथ. रमाकांत काठमोरे, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, मतदारदूत डॉ.अमोल बागुल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना
- नेवासा तालुक्याती मंदिरातील टाळ चोरीचा गुन्हा पोलिसांनी २४ तासातच आणला उघडकीस, आरोपींना अटक