नैसर्गिक विधीसाठी जाणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

Published on -

राहुरी ;- पहाटे नैसर्गिकविधीसाठी जात असलेल्या महिलेस एका इसमाने पाठीमागे येवून हात पकडून मी तुझ्या सोबत येवू असे म्हणत लजा उत्पन्न होईल

असे कृत्य केल्याने पोलिसात विनयभंग केल्याचा गुन्हा ३६ वर्षिय महिलेने दाखल करताच पोलिसांनी आरोपीस गजाआड केले आहे.

राहुरी तालुक्यातील केंदळ भागात ३६ वर्षिय विवाहित महिला ही दि. १९ जून रोजी पहाटच्या दरम्यान नैसर्गिक विधीसाठी जात असतांना

येथिल विनायक श्रीधर सावंत याने पाठिमागे येवून संबंधित महिलेचा हात धरला व मी तुझ्या सोबत येवू का असे म्हणत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

या बाबतचा जाब विचारण्यासाठी पिडीत महिलेचे पति गेले असता त्यांनाही विनायक सावंत याने शिविगाळ करत धमकी दिली आहे. राहरी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe