ज्या धर्मगुरूने कायदा बनवला तोच अडकला … विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्याने झाली ‘हि’ शिक्षा !

Ahmednagarlive24
Published:

वृत्तसंस्था :-  इंडोनेशियातील सुमात्रामध्ये मुखलिस बिन महंमद नावाच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी २८ वेळा चाबकाचे फटके मारण्यात आले. विवाहित महिलेशी संबंध असल्याचा मुखलिसवर आरोप आहे. इंडोनेशियात याला व्यभिचार मानले जाते.

ज्या महिलेसोबत मुखलिसला पकडण्यात आले तिलाही २३ फटके मारण्यात आले. विशेष म्हणजे ज्या एकेह उलेमा काैन्सिलने हे कडक नियम बनवले आहेत त्याच्याशी मुखलिसचा संबंध आहे. मुखलिसनेच व्यभिचार करणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्यात पुढाकार घेतला होता. 
ह्या लोकांची अशी धारणा आहे कि, हे अल्लाने बनवलेले नियम आहेत. जो हे नियम तोडेल त्याला शिक्षा मिळेल. मग तो उलेमा कौन्सिलचा सदस्य असला तरी. 

या जोडप्याला सुमात्रा समुद्रकिनाऱ्यावर एका कारमध्ये पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी शिक्षा देण्यात आली. मुखलिसला कौन्सिलमधून हटवण्यात आले आहे. 

मुखलिस धर्मगुरूदेखील आहे. तो पहिलाच धर्मगुरू आहे, ज्याला देशात २००५ मध्ये शरिया कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिकरीत्या फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment