श्रीरामपूर – श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी मलाच मिळेल, असा दावा ज्येष्ठ साहित्यिक व शिवसेनेचे इच्छूक उमेदवार लहु कानडे यांनी व्यक्त केली असून ते म्हणाले की , आमदार कांबळे यांनी जरी शिवसेनेत प्रवेश केला तरी उमेदवारी मलाच मिळेल.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझ्यासारख्या निष्ठावंत व जनाधार असलेल्या कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाही. सर्वशिवसैनिक व चाहते मतदार ‘ भेटून प्रतिक्रिया देत आहेत . आम्ही मात्र संयम ठेवून आहोत.

उलट उद्यापासून गावोगाव जावून शिवसैनिकांना भेटून पक्षाच्या नेत्यांकडे भूमिका मांडू. मागील विधानसभेला युती नसतानाही झुंजारपणे लढून आम्ही पक्षप्रतिष्ठा राखली आहे. आजही सर्वाधिक संपर्क आहे . तरुणांमध्ये आपुलकी आहे व ज्येष्ठ समजूतदार सैनिक सोबत आहेत.
त्यामुळे पक्ष उमेदवारी देताना नाकीच माझाच विचार करीन, अशी माझी भावना आहे, असेही लहु कानडे यांनी म्हटले असून गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने चांगले मतदान केले.
आताही जनतेच्या प्रचंड संपर्कात असल्याने जनतेच्या आशीर्वादाने श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात भगवा झेंडा फडकेल, असा दावाही लहु कानडे यांनी केला आहे.
- Tata च्या ‘या’ शेअर्सने 30 दिवसात गुंतवणूकदारांना बनवले मालामाल! मिळालेत 60% रिटर्न, आता Stock Split ची मोठी घोषणा
- ऑक्टोबरमध्ये लाँच होणार Vivo कंपनीचे ‘हे’ दोन स्मार्टफोन !
- शेअर मार्केटमधील ‘ही’ आयटी कंपनी देणार 5.75 रुपयांचा Dividend ! रेकॉर्ड डेट कोणती?
- केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पण वाढला! वाचा डिटेल्स
- ग्राहकांसाठी सुवर्णसंधी ! 100x झूम आणि 50 MP कॅमेरा असणारा ‘हा’ विवोचा स्मार्टफोन 10,000 रुपये स्वस्तात मिळणार