नगर | विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना डावलून भाजपने विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी दिली.
या पार्श्वभूमीवर खासदार गांधी रविवारी (२४ मार्च) मेळावा घेऊन आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
दरम्यान, गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र हे सध्या ग्रामीण भागातील जनावरांच्या चारा छावण्यांना भेटी देण्यात मग्न आहेत.
खासदार गांधी यांनी शेवटपर्यंत उमेदवारीसाठी प्रयत्न केेले, मात्र त्यांना यश आले नाही. डॉ. विखे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर गांधींच्या निवासस्थानी त्यांच्या समर्थकांची बैठक झाली.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार गांधी टिळक रस्त्यावरील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.