अहमदनगर ;- महानगर पालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा सभागृहाचा दोन वर्षापुर्वी ठराव झालेला असताना पुतळा तातडीने बसविण्याची मागणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह 11 शिवप्रेमी संघटनांच्या वतीने करण्यात आली.
सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा चारही नगरसेवकांनी दिला आहे. मागील दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.

मात्र त्याच्या परवानगीसाठी एवढा मोठा कालावधी निघून गेला आहे. माजी उपमहापौर छिंदम याने वादग्रस्त वक्तव्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्याचवेळी महापालिकेत पुतळा बसविण्याची मागणी करण्यात आली होती.
या संदर्भात सर्व नगरसेवकांनी ठराव देखील मंजुर केला होता. या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले. सदर पुतळा बसविण्याची कार्यवाही न झाल्यास चारही नगरसेवकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
- ई-केवायसीतील चुका ठरल्या अडथळा; नाशिक जिल्ह्यातील १.७३ लाख ‘लाडक्या बहिणी’चा जानेवारी हप्ता होल्डवर
- शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी नवीन कृषी कायदे; बनावट बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचा इशारा
- १ फेब्रुवारी २०२६ पासून आर्थिक बदल; घरगुती बजेटवर होणार थेट परिणाम
- आठव्या वेतन आयोगावरून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा; 12 फेब्रुवारीला देशव्यापी एकदिवसीय संपाची शक्यता
- Volkswagen India ची 2026 साठी मोठी तयारी; 5 नवीन कार्स लाँच होणार, Tayron R-Line ठरणार सर्वात खास SUV













