रत्नागिरी : निवडणुकांच्या निकाल जाहीर होण्या आधीच विजयी मिरवणूक काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय कदम चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय कदम हे खेड दापोलीचे उमेदवार आहेत. संजय कदम यांच्यासह पत्नी सायली कदम आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभेचे मतदान पार पडल्यानंतर संजय कदम यांचे काही समर्थक खेड येथे जमा झाला. त्यानंतर त्यांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली. मात्र तरीही ही मिरवणूक बंद न करता ती सुरु होती. यामुळे संजय कदम यांच्यावर पोलीस चांगलेच संतापले. त्यांनी ताबडतोब ही मिरवणूक रद्द करायला लावली.
मात्र त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर संजय कदम यांनी ही मिरवणूक पुन्हा सुरु केली. दरम्यान निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत संजय कदम यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहिल्यानगर मधील बनावट GR प्रकरणात मोठी अपडेट ! ‘त्या’ ठेकेदारावर गुन्हा दाखल, प्रशासन हादरलं !
- Samsung Galaxy Z Fold 7 लाँच ! 200MP कॅमेरा, AI फीचर्स, किंमत ऐकून थक्क व्हाल!
- अहिल्यानगर जिल्ह्यातून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी नगर – मनमाड महामार्ग…
- म्युच्युअल फंडमध्ये पहिल्यांदाच गुंतवणूक करताय? मग ‘हे’ 8 नियम नक्की समजून घ्या!
- कुठे चाललोय आपण?, देशातील सहावीच्या मुलांना साधा गुणाकारही जमेना, भागाकार तर दूरच! सरकारी सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासे