अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालणार

Published on -

श्रीरामपूर : तालुक्यातील बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या सातभाई वस्ती (मळहद) परिसरातील नागरिकांनी नागरी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत ग्रामस्थांनी निवेदन प्रसिद्धीस दिलेले आहे. त्यात म्हटले आहे, की प्रवरा नदीच्या पलिकडील सातभाई वस्ती, मळहद, बागवान मळा हा भाग बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीत येतो. तथापि, या भागात रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, ्ट्रिरट लाईट अशी विकासकामे होत नाहित.

तसेच घरकूलासंदर्भातही अडवणूक केली जाते. प्रत्येक निवडणुकीला मते मिळविण्यासाठी आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात कामे होतच नाहीत, अशा स्वरुपाच्या या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

याबाबत बेलापूर बुद्रुक गावाच्या २५ सप्टेंबर रोजीच्या ग्रामसभेत आम्हाला बेलापूर खुर्द ग्रामपंचायतीत समाविष्ट व्हायचे आहे.

त्यामुळे परवानगी मिळावी आशी मागणी करण्यात आली होतो. मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने संबंधितांनी सरपंच, ग्रामसेवक यांना निवेदन देऊन परवानगीपत्र देण्याची मागणी केली असून मागणीनुसार परवानगी न दिल्यास यापुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News