पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव

Ahmednagarlive24
Published:

नवी दिल्ली : सार्वजनिक स्वच्छतेच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘स्वच्छ भारत अभियाना’ची दखल घेत अमेरिकेतील बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन या संस्थेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे.

ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदींचा या पुरस्काराने गौरव होणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली.

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह एका ट्विटद्वारे या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासंदर्भात माहिती देताना म्हणाले की, आणखी एक पुरस्कार, प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणखी एक क्षण. पंतप्रधान मोदींची मेहनत व त्यांच्या प्रगतिशील धोरणांचे जगभर कौतुक होत आहे.

पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान त्यांचा बिल ॲण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनकडून या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी तसेच रशियाने पंतप्रधानांचा गौरव केला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. मे २००८ मध्ये बिल गेट्स यांनी आधार कार्ड योजनेचे समर्थन केले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment