अविनाश आदिकांच्या गाडीतून साडेसहा लाखांची रोकड हस्तगत !

Ahmednagarlive24
Published:

नाशिक : राज्यात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूच्या वाहतुकीवर निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. २७) दोन ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईत ६ लाख ६० हजार ६४० रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.

यात त्र्यंबक तालुक्यातील अंबोली चेक पोस्टवर एका व्यापाऱ्याकडे २ लाख २ हजार ६४० रुपये मिळाले, तर शिंदे गावाजवळील कारवाईत अविनाश गोविंदराव आदिक यांच्या वाहनातून ४ लाख ५८ हजार रुपयांची रक्कम हस्त करण्यात आली. दरम्यान, ही रक्कम कोठून आली? कोणत्या कामासाठी वापरण्यात येणार होती, याबाबत चौकशी सुरू आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर रोख रकमेची वाहतूक, देवाण-घेवाणीवर निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासन, आयकर विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. एक लाखाहून अधिकची रोकड ने-आण करण्यावर नजर ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गाव परिसरात शुक्रवारी (दि. २७) रात्री ११ वाजेच्या सुमारास स्थिर बैठी पथकातील सदस्य हरी सूर्यवंशी, संतोष पिंगळे, पोलीस कॉन्स्टेबल शामराव शिंदे, सखाराम शेळके यांनी वाहन क्र. (एमएम १७ सीडी ३१४९) ची तापसणी केली.

यावेळी अविनाश गोविंदराव आदिक यांच्याकडून सुमारे ४ लाख ५८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. ही रक्कम मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. निवडणूक काळात एक लाखाहून अधिक रकमेची वाहतूक होत असल्यास त्याची चौकशी करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

त्यानुसार आयकर विभाग, राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवस्थापक, पोलीस आणि इतर सरकारी अधिकारी यांची एकत्रित समिती स्थापन करून भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाभरात ठिकठिकाणी तपासणी करत आहे.

दरम्यान, या दोन्ही कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली रक्कम कोठून आली, कोठे नेण्यात येत होती, कोणत्या कामासाठी वापर केला जाणार होता? आदी बाबींचा तपास सुरू आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment