नगर : पक्षीय राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते असते. निवडणूक संपली की पक्षीय राजकारण बाजूला ठेवून विकासाचे राजकारण मी गेल्या पाच वर्षापासून केले आहे. शहरात आयटीपार्क सुरु करून तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
मात्र ज्यांनी २५ वर्ष व्यापार, उद्योग बुडवण्याचे उद्योग केले ते आता निवडणुकीच्या निमित्त पोकळ गप्पा मारत आहेत, अशी टिका आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेवर केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आयोजित व्यापाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी राजेंद्र चोपडा, विशाल शेटीया, डॉ. सचिन भंडारी, कमलेश भंडारी, भूषण भंडारी, नितिन शिंगवी, राजेश भंडारी, मुकुंद धूत, विनोद मालपाणी, भरत जाकोटिया, दिपक बोयटा, अनिल लुंकड, ईश्वर बोरा, सुनिल भंडारी, धनेश कोठारी,
राहुल भंडारी, अमित मुथा, प्रशांत मुथा, अविनाश घुले, प्रविण कोठारी, अभय गुजराथी, भाऊसाहेब पांडुळे, सचिन डुंगरवाल, सुरेश धामत आदी उपस्थित होते. जगताप म्हणाले, नगर विकासकामाच्या दृष्टीने महत्वाचे शहर आहे. मध्यवर्ती शहर असल्यामुळे शहराचा विकास होणे गरजेचे होते, परंतु त्यासाठी यापूर्वीच्या नेतृत्वाने कधीही प्रयत्न केले नाहीत.
मागील पाच वर्षापासून मी विकासाला चालना देण्याचे काम केले आहे. नगर शहरात अनुचित प्रकार घडवायचा व नंतर व्यापारी बाजारपेठ बंद करायच्या या प्रकारामुळे ग्रामीण भागातील ग्राहक नगर शहरात खरेदीसाठी येत नव्हता.
व्यापाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्याचे काम त्यांनी केले. मी फक्त विकासाचे राजकारण केले आहे. आता आपल्याला सर्वांना मिळून नगर शहराचे रुपांतर महानगरामध्ये करायचे आहे. पुणे-नाशिक शहराबरोबर नगरची ओळख निर्माण करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
- संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय
- Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!
- आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?
- Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार
- Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही