जिल्‍हा रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार

Published on -

अहमदनगर :- जिल्‍हयातील सर्वसामान्‍य रुग्‍णांना आरोग्‍य सेवा देण्‍याचे कार्य जिल्‍हा रुग्‍णालयाच्‍या माध्‍यमातून होत आहे. जिल्‍हयात सामान्‍य रुग्‍णालयासाठी आवश्‍यक सुविधा उपलब्‍ध करुन देणार असल्‍याचे जिल्हयाचे पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी आज सांगितले.

जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात जिल्‍हा नियोजन अंतर्गत सिटीस्‍कॅन, सीएसआर अंतर्गत डि‍जिटल एक्‍सरे व व्‍हॅन्‍टीलेटर मशिनचा लोकापर्ण सोहळा पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या उपस्थित झाला.

यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्‍यक्षा राजेश्री घुले, खासदार दिलीप गांधी, जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्‍हा शल्‍यचिकित्‍सक डॉ.पी एम मुरंबीकर, डॉ.बापूसाहेब गाडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. प्रकाश सांगळे आदि उपस्थित होते.

पालकमंत्री प्रा. शिंदे म्‍हणाले, अहमदनगर हे राज्‍यातील मध्‍यवर्ती शहर आहे. त्‍यामुळे जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात येणा-या रुग्‍णांची संख्‍या अधिक आहे. त्‍यामुळे आधुनिक सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यावर शासनाचा भर आहे.

जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयात आर्थिक अडचणीतील व गरजू रुग्‍णांना उपचार मिळतात. सद्यस्थितीत अत्‍याधुनिक मशीनचा उपयोग करुन आजाराचे निदान केले जाते.

ह्दयविकारावर उपचार करण्‍यासाठी आधुनिक सुविधा लवकरच उपलब्‍ध होईल असे सांगून सर्वसामान्‍यांना वैद्यकीय सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी सुरु केलेल्‍या आयुष्‍यमान भारत योजनेचा रुग्‍णांनी लाभ घ्‍यावा असे आवाहन त्‍यांनी केले.

खासदार श्री गांधी यांनी राज्‍यातील एका चांगल्‍या रुग्‍णालयाकडे जिल्‍हा सामान्‍य रुग्‍णालयाची वाटचाल सुरु असल्‍याचे सांगून रुग्‍णालयाच्‍या कामकाजाबाबत समाधान व्‍यक्‍त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe