अहमदनगर ब्रेकिंग : ट्रक -कारच्या भीषण अपघातात चार ठार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – नगर-दौड महामार्गावर बाबुर्डी बेंद परिसरात रात्री अडीचच्या सुमारास ट्रक आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात भिंगारचे तीन व वाळकीचा एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

नगर दौड महामार्गावरील बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ ट्रक व कारचा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार चक्काचुर झाली होती. कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना ट्रक खाली घुसन हा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी धाव घेतली. कार्ले यांच्यासह सरपंच दीपक साळवे, शरद चोभे, मिनीनाथ चोभे, राघू चोभे, मणेश भोसले यांनी अपघातग्रस्तांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात मदत केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment