मुलीच्या लग्नापूर्वी पित्याने उडवले घर

Ahmednagarlive24
Published:

एजवूड : अमेरिकेच्या पिट्सबर्ग येथे एका मनोरुग्ण पित्याने मुलीच्या लग्नादिवशी स्वत:चे घर स्फोटकांनी उडविल्याने शनिवारी खळबळ उडाली. या स्फोटात नवरी मुलीचा पिता ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलीच्या लग्नासाठी कुटुंबातील सदस्य व नातेवाईक लग्नस्थळावर लगबग सुरू असताना रात्रीच्या सुमारास पित्याने स्वत:च्या घरात स्फोट घडवून आणला. या स्फोटात ठार झालेल्या पित्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment