कोपरगाव :- तुझे आई-वडील आंधळे आहेत. मी त्यांना सांभाळेन. तू माझ्याशी लग्न कर, असे आमिष दाखवून एका युवकाने १६ वर्षांच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवत तिच्यावर अत्याचार केले. त्यातून ती गर्भवती झाली.
या प्रकरणी पोलिसांनी आकाश रमेश रणशूर (सोनारवस्ती, मुर्शतपूर, धारणगाव रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पीडित मुलीने फिर्याद दिली.
आकाशने लग्नाचे आमिष दाखवून मुर्शतपूर फाटा सोनार वस्ती येथे राहण्यास नेले. लग्न न करता त्याने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे मी गर्भवती राहिले.
त्यानंतर २८ डिसेंबर २०१८ रोजी आकाशने लग्न केल्याचे समजले. सोनार वस्ती येथे त्याच्या घरी गेले असता आकाश व दीपक खरताळे यांनी मारहाण केली असे पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत सांगितले आहे.