अहमदनगर :- जात पडताळणी समिती कार्यालयात लाचलुचपतच्या पथकाने सापळा रचून एकाला 15 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले अविनाश विश्वनाथ मगर असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पत्नीचे ओ.बी.सी. कुणबी प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्राचे काम करून देवून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक अविनाश विश्वनाथ मगर, विधी अधिकारी,जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, अहमदनगर

यांनी २७ रोजी लाच १५ हजार रुपये लाचेची मागणी केली. व आज रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय असलेल्या रेव्हेन्यू सोसायटीचे इमारतीतील तळमजल्यावर तक्रारदार यांना जात वैधता प्रमाणपत्र देवून आरोपी अविनाश विश्वनाथ मगर यांनी पंचासमक्ष १५ हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सुनिल कडासने, निलेश सोनवणे, अपर पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगरकडील पोलीस उप अधीक्षक हरीप खेडकर, पोलिस निरीक्षक श्याम परवरे, पोलीस निरीक्षक दिपक करांडे, पोहेका तनवीर शेख, पोना.प्रशांत जाधव, पोना रमेश चौधरी, राधा खेमनर, चालक पोहेकॉ. अशोक रक्ताटे यांनी केली आहे.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा