घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Published on -

कोपरगाव :- घरात घुसून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शिवाजी रस्ता भागात गुरूवारी घडली. या प्रकरणी विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

शैलेंद्र राजेंद्र वाघ (बेट) असे संशयिताचे नाव आहे. सकाळी मुलगी घरात असताना आरोपी आला. त्याने समोर बसलेल्या आजीला माझ्याबद्दल विचारले. कसला आवाज येतो, म्हणून मी बाहेर येऊन बघितले असता आरोपीने मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे.

मी नाही म्हणाले, तर त्याने माझा हात धरुन अश्लील हावभाव केले, शिवीगाळ केली. आरडाओरडा करताच तो पळून गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे सहायक निरीक्षक भारत नागरे तपास करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe