श्रीगोंदा :- तालुक्यातील काष्टी येथील जयभवानी चौकात बिंगो जुगार खेळणारे दत्तात्रय बाळासाहेब वाडगे (वय २६), दत्ता अशोक गायकवाड (२६), जयंत संजय आढाव (१९) आणि राजू कैलास खरात (२७, काष्टी) यांना रंगेहात पकडून पोलिस उपनिरीक्षक गजानन बोडके यांनी त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख १० हजार ३५० रुपये हस्तगत केले. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. कॉन्स्टेबल दादासाहेब भाऊसाहेब टाके यांच्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
