पाथर्डी :- लायकी नसणारे तुरुंगात जाऊन आल्याने आमच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. टीका करणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा.
आम्ही विकासासाठी घरे भरतो. तुम्ही कशासाठी कोणाची घरे भरता? जळी, स्थळी प्रताप ढाकणे यांना पाहणाऱ्यांनी आपल्या अवकातीत रहावे;

अन्यथा तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढेन, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर व आमदार मोनिका राजळेंचे नाव न घेता दिला.
अकोले येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी केदारेश्वर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे होते,
तर प्रमुख पाहुणे म्हणून करोडीचे सरपंच डॉ. राजेंद्र खेडकर, नगरसेवक बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, कैलास देवढे, कुमार फुंदे, अर्जुन धायतडक, देवा पवार, सरपंच अनिता गर्जे, मारुती पालवे, लता रंधवे आदी उपस्थित होते.
ढाकणे म्हणाल्या, ढाकणे कुटुंबाने पन्नास वर्षांपासून तालुक्यात समाजकारण केले.
आमच्या गावात येऊन आमच्याविरोधात अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्यांना त्यांच्या नेतृत्वाने आवरावे; अन्यथा जशास तसे उत्तर देऊ. प्रास्ताविक माजी सरपंच अनिल ढाकणे यांनी केले.