पितृपक्षानंतर भाजप करणार उमेदवारांची घोषणा

Ahmednagarlive24
Published:

हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कोअर कमिटीची बैठक नवी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा होते. यावेळी विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या उमेदवाराच्या नावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला.

पितृपक्षानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटलेले आहे. आगामी महिन्यात २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून, या निवडणुकीच्या अनुषंगाच्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, हरियाणाचे प्रभारी अनिल जैन, हरियाणा निवडणूक प्रभारी नरेंद्रसिंह तोमर, प्रदेशाध्यक्ष सुभाष बरालांसह अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.

या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाच्या उमेदवाराच्या नावांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. पितृपक्षानंतर २८ सप्टेंबर रोजी संसदीय बोर्डाची बैठक होईल आणि या बैठकीतच उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे भाजपने म्हटलेले आहे.

तसेच राज्यात शिरोमणी अकाली दलासोबत युती करण्यात येणार आहे. या राज्यात २१ ऑक्टोबर रोजी ९० जागांसाठी मतदान होत असून, २४ रोजी मतमोजणी होणार आहे. या राज्यात भाजप-शिरोमणी अकाली दलासह काँग्रेस, आयएनएलडी, इनैलो पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment