शिवसेना पुन्हा सत्तेपासून दूर रहाणार ?

Published on -

अहमदनगर :- शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महापौर निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीच्या बडतर्फ नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.

आता, पुन्हा तीच खेळी स्थायी समिती सभापती निवडणुकीत खेळण्याच्या हालचाली आहेत. या निवडणुकीत जर भाजप-शिवसेना युतीचा निर्णय झाला तर बडतर्फ गट कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उतरून वेळप्रसंगी भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे समजते.

स्थायी समिती सभापती तसेच महिला-बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदाच्या निवडीसाठी मनपा प्रशासनाकडून नाशिक विभागीय आयुक्तांना सोमवारी प्रस्ताव सादर झाला आहे.

विभागीय आयुक्तांकडून तारीख आल्यानंतर या निवडी होणार आहेत. स्थायी समितीत शिवसेनेचे सर्वाधिक 6 सदस्य असून राष्ट्रवादी बडतर्फ 5, भाजप 3 तर कॉंग्रेस व बसपचा प्रत्येकी एक सदस्य आहे.

बहुमतासाठी 9 सदस्यांची आवश्यकता आहे. महापौर निवडणुकीत भाजपला साथ दिल्याने भाजपने बसपला स्थायी समिती सभापतीपदाचा शब्द दिलेला आहे.

मनपात अद्याप शिवसेना- भाजप युतीचा निर्णय झालेला नाही. युती झाल्यास सभापतीपद शिवसेनेकडे येऊ शकते. युतीचा निर्णय झाल्यास राष्ट्रवादीचे बडतर्फ नगरसेवक सभापतीपदाच्या निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगण्यात येते.

या गटाचे 5 संख्याबळ असून कॉंग्रेस 1 व भाजपच्या 3 सदस्यांचा पाठिंबा घेण्यात येणार असल्याचे या गटाच्या गोटातून सांगण्यात येत आहे.

भाजपचे हे तीन सदस्य पूर्वी राष्ट्रवादीत होते. ते आ. जगताप समर्थक मानले जात असत, असेही सांगितले जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe