मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद थांबण्याचं नावच घेत नाही. पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. कंगनाने अभिनेता हृतिक रोशनवर निशाणा साधला आहे. पुन्हा एकदा कंगनाने आपला राग व्यक्त करत एक वक्तव्य केलं आहे.
कंगना रानौत आपल्याकडून हृतिकवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाही. आता कंगनाने असं काही वक्तव्य केलंय की, ते ऐकून हृतिक देखील शांत बसणार नाही. कंगना म्हणाली की, जर ती हृतिक रोशन असती तर गप्प बसली नसती.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, कंगना एका कार्यक्रमात गेली तेव्हा तिने हे वक्तव्य केलं आहे. कंगना रानौतला विचारलं की, जर तुला एक दिवसाचा हृतिक रोशन केलं तर तू काय करू इच्छिते.
उत्तर देताना कंगना म्हणाले, आमच्या दोघांमध्ये जे काही झालं. किंवा आम्ही दोघांनी एकमेकांसोबत जे काही केलं त्यानंतर मी हृतिक असती तर कंगनाला फोन केला असता. आणि म्हटलं असतं की, मी तुझ्यासोबत जे काही केलं त्यासाठी ‘सॉरी’.
- रतन टाटांची गुंतवणूक असलेल्या कंपनीसोबत व्यवसाय करा आणि महिन्याला लाखो कमवा! जाणून घ्या माहिती
- मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीमुळे सात मालमत्ताधारकांवर कारवाई पाच घरांना महानगरपालिकेने ठोकले सील, दोघांचे नळ कनेक्शन तोडले
- आयटीआर फाईल कराल तर मिळतील चकित करणारे फायदे! तुम्ही कधी विचार देखील केला नसेल
- भारतीय रिझर्व बँकेचा मोठा निर्णय ! ‘ही’ बँक खाती बंद होणार, तुमचे खाते लिस्टमध्ये आहे का?
- होमलोनचा हप्ता थकल्यावर लगेच होते का मालमत्तेची जप्ती? कशी असते बँकेची प्रक्रिया?