राहुरी :- सत्तेत असताना ज्यांना विकासाचे प्रश्न सोडवता आले नाहीत, असे पुढारी मी केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याची टीका आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली.
प्रिंपी अवघड येथील २५ लाखांच्या विविध कामांचे भूमिपूजन करताना कर्डिले म्हणाले, मी दुष्काळी भागातील असल्याने पाण्याचे महत्त्व मला ठाऊक आहे.

सोनई प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून प्रिंपी अवघड गावाला तात्पुरते पाणी देण्याचा प्रश्न सुटल्याचे समाधान आहे. सडे, उंबरे, ब्राह्मणी, पिंप्री, मोकळ ओहोळ गावांसाठी मुळा धरणातून ४७ कोटींच्या पाणी योजनेचे काम लवकरच मार्गी लागेल.
आंदोलने करून प्रश्न सुटत नाहीत. प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुराव्याची गरज असते. गेली २५ वर्षे पाठपुरावा करून प्रश्न सोडवल्याने जनतेने मला स्वीकारले, असे त्यांनी सांगितले.
राहुरी शहरासाठी २७ कोटींची सुधारित पाणी योजना मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. २५ वर्षात राहुरीकरांनी न पाहिलेला निधी मतदारसंघात गेल्या ९ वर्षांत पहावयास मिळाला.
राहुरी मतदारसंघ असेपर्यंत मीच आमदार राहीन, असा विश्वास कर्डिलेंनी बोलून दाखवला.