श्रीगोदा : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांच्या प्रचारात जनतेने आघाडी घेतली आहे, आज आठवडे बाजार च्या दिवशी पाचपुते यांनी प्रचार केला यावेळी बाजारकरूं शेतकऱ्यांशी पाचपुते यांनी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे काही दिवस उरले असताना प्रचारात दिवसेंदिवस रंगत वाढू लागली महायुतीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांनी सोमवार चा आठवडे बाजार असल्यामुळे स्वतः पाचपुते यांनी बाजारातून स्वतः फेरी काढली यावेळी शेतकऱ्यांनी पाण्याअभावी झालेली शेतीची वाताहत दादांना सांगीतली हे सांगताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले होते

कोणाच्या फळबागा डोळ्यादेखत जळून गेल्या तर कोणाच्या उसाच्या काडक्या झाल्या अशी खंत व्यक्त केली व पाण्याच्या मुद्यावर दादांना आमदार केल्याशिवाय शेतकरी राहणार नाही असा शब्द शेतकऱ्यांनी दिला फेरीच्या दरम्यान बाजारकरू शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाचपुते म्हणाले कि मागील पाच वर्षात घोड कुकडी च्या पाण्याच्या अभावी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे व आता आपण हि निवडणूकच पाण्याच्या मुद्यांवर लढवत आहोत असे पाचपुते म्हणाले.
यावेळी बाजारात मुस्लिम व्यापाऱ्यांनीही पाचपुते यांचे मिठाई भरवून स्वागत केले आणी दादांच आमचा पक्ष असल्याने तालुक्यातील सर्व मुस्लिम समजा उभा राहणार आहे असा शब्द उपस्थित मुस्लिम बांधवांनी दिला.
- नगर जिल्ह्यासाठी नव्या बसेस द्या ! खा.नीलेश लंके यांचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांना साकडे
- पिंपरी-चिंचवडमध्ये घर घेण्याआधी ही बातमी वाचा ! नाहीतर घराचं स्वप्न राहील अपूर्ण…
- iQOO Neo 10R लाँच होण्याआधीच लीक ! 6400mAh बॅटरी, 80W फास्ट चार्जिंग आणि दमदार कॅमेरासह येणार
- Tata Motors शेअर्समध्ये सतत घसरण, Motilal Oswal यांनी सांगितलं कारण
- EPFO Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा, ठेवींवर मिळणार इतके व्याज