अहमदनगर: महायुतीच्या प्रचाराच्या संगमनेरमधील सभेत भाजपचे तरुण खासदार सुजय विखे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर सडकून टीका केली. सुजय विखे म्हणाले, “मी संगमनेरमध्ये जास्त येऊ शकणार नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यांना 24 ऑक्टोबरला आम्ही महाराष्ट्रात फिरायला नक्की मोकळं करू.”
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील महायुतीच्या या सभेला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
संगमनेर माझा आवडता जिल्हा आहे. या मतदारसंघात परिवर्तन होणार याची मला खात्री आहे, असाही दावा सुजय विखेंनी केला. महायुतीची ही सभा संध्याकाळी झाली असती, तर लोकांनी घरे बंद करून सभेला गर्दी केली असती, असंही त्यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत संगमनेरमधून आपल्याला 13 हजार मतांची आघाडी मिळाल्याचंही विखेंनी नमूद केलं. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांने जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा निवडून आणण्याचा निर्धार केल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्ही ठाकरे घराण्याचे उपकार विसरणार नाही, असं म्हणत विखेंनी उद्धव ठाकरेंना आपण दिलेल्या उमेदवाराचे प्रामाणिक काम करू, असे आश्वासनही दिले.
- केजरीवाल, सिसोदियांविरुद्ध हवालाकांडाचा खटला चालणार ; दिल्लीच्या रणधुमाळीत अडचणी वाढल्या
- दक्षिण कोरियाच्या पदच्युत राष्ट्रपतींना अखेर अटक ; आणीबाणी लागू करणे भोवले
- झुकरबर्गच्या वक्तव्यासाठी मेटा इंडियाने मागितली माफी
- खंडणीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर ईडीचा हस्तक्षेप का नाही ? खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल…
- कुंभमेळ्याला जाण्यासाठी नगरकरांसाठी दोन रेल्वे