तिसगाव : शेतकऱ्यांचा आम्ही आदर करतो. चेक पाठवणारा या योजनेचा लाभार्थी होता का? त्याच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. मी भाषण कर्जत-जामखेडला केले. मात्र, चेक संगमनेरचा माणूस देतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास करून मला बदनाम करण्यात आले, असा आरोप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केला.
विखे म्हणाले, आम्ही केलेल्या कामाची मते मागत असून विरोधक खोटेनाटे आरोप करत आहेत. आजची दुष्काळी परिस्थिती आपण पहात असून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. शेतकऱ्यांवर गोळीबार केला, धरणाबद्दलची अश्लिल भाषा वापरली, त्यावेळेस डोळे पाणवले का नाही.

सिंचन घोटाळा, बँक घोटाळा करून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये जावेच लागेल. राहुरी तालुक्यातील नावारूपाला आलेल्या अनेक संस्था तनपुरेंनी बंद पाडल्याने ते काय मतदारसंघाचा विकास करणार. तिसगावला पाणीटंचाई आहे. त्यावर तत्काळ उपाययोजना केल्या जातील.
- श्रीरामपूर-पुणे बसेस नफ्यात, तरीही नवीन बसेस नाहीत ! प्रवाशांची गैरसोय कधी संपणार?
- सौरऊर्जा ग्राहकांची लूट ! ३ रुपयांना वीज द्या, १७ रुपयांना परत खरेदी करा
- गर्भनिरोधक गोळ्या आणि स्ट्रोकचा संबंध – महिलांसाठी धोक्याची घंटा!
- Mutual Fund Investment : शेअर बाजारातील अस्थिरता वाढली ; म्युच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ
- अहिल्यानगरमध्ये मस्साजोग ! अपहरण केलं ,फ्लॅटवर डांबलं,चेंबरमध्ये मारहाण, व्हिडीओ आणि डोंगरावर जाळलं…