बँकॉक : थायलंडमध्ये एख नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. त्याअंतर्गथ लोक आपल्या घरामध्येही सिगारेट ओढू शकत नाहीत. समजा घरामध्ये सिगारेट ओढताना पकडले गेले तर त्यांना थेट गजाआड केले जाईल.
सोबतच संबंधित व्यक्तीवर घरेलू हिंसेचा खटलाही चालविला जाईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, दरवर्षी धूम्रपानामुळे सहा लाख लोकांचा मृत्यू होतो. त्यात ६० टक्के फक्त मुले असतात. ती दुसऱ्यांना फुंकलेल्या सिगारेटच्या धुराच्या संपर्कात आल्यामुळे प्राणास मुकतात.

घरातील मुले आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी थायलंड सरकारने हा निर्णय घेतला आहे. कुटुंब सुरक्षा आणि विकास कार्यक्रमाअंतर्ग हा कायदा गेल्या आठवड्यापासून लागू करण्यात आला.
बँकॉकमध्ये तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनासंबंधी झालेल्या परिषदेत महिला व कुटुंब कल्याण विभागाच्या प्रमुख लेर्टपान्या बूरानाबंडित यांनी सागंतिले की, कुटुंबातील कोणताही सदस्याचे आरोग्य इतरांनी केलेल्या धूम्रपानामुळे खराब होऊ शकते.
असे झाल्यास धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला आता खटला दाखल केला जाईल. तज्ज्ञांनी सांगितले की, धूम्रपानाचे व्यसन भावनिक व शारीरिक हिंसेचे कारण ठरते. एका सर्वेमध्ये असे दिसून आले की, ४९ लाख घरांमध्ये कुणीतरी सिगारेट ओढते.
१०.३ लाख लोकांना कुटुंबातील सदस्यांच्या धूम्रपानामुळे भविष्यात धूम्रपानाचे व्यसन जडते. थायलंडच्या वेगवेगळ्या केंद्रामध्ये धूम्रपानाचे खटले चालविले जातील. पोलीस आधीच चौकशी करतील व नंतर कारवाई करतील.
- SIP गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी ! Mutual Fund SIP सुरू ठेवावी का थांबवावी ?
- कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मारुती फ्रॉन्क्स फक्त ₹6.60 लाखात मिळवा
- Best SUV Under 10 lakhs : दहा लाखांच्या आत मिळतात ह्या 5 कार ! आणि 5 स्टार सेफ्टीसुद्धा…
- Tesla ला टक्कर देणार Tata ची दमदार Sierra EV ! पहा लाँच आणि किंमत
- सोन्याचे भाव 4 हजार रुपयांनी घसरलेत ! 27 फेब्रुवारीचे 10 ग्रॅम सोन्याचे रेट कसे आहेत ? महाराष्ट्रात काय आहे स्थिती ?