शिर्डी :- मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुरेश थोरात यांनी प्रचार दरम्यान नवीन प्रचाराची शक्कल लढवत कार्यकर्त्यांसह रांजणगांव देशमुख गावात मंदिरातच मुक्काम केला. रांजणगाव देशमुख येथील हनुमान मंदिरात रात्री नागरिकांच्या भेटीगाठी झाल्यानंतर काँग्रेसचे उमेदवार थोरात यांनी तिथेच अंग टाकले.
रात्री गावकऱ्यांनी उमेदवारासर सर्वांना पिठलं भाकरी जेवण दिले. यावेळी नवनाथ महाराज आंधळे, गबाजी खेमनर,अण्णासाहेब थोरात,रामदास काकड उपस्थित होते. नागरिकांशी संवाद साधतांना थोरात म्हणाले, राहता मतदार संघातील पश्चिम भागासाठी निळवंडेचे कालवे महत्त्वाचे आहेत.

आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण पूर्ण केले. कालव्यांची कामे काही प्रमाणात मार्गी लावली आहेत. प्रवरा परिसर सुखी राहण्यासाठी राहत्याच्या नेतृत्वाने निळवंडेच्या कालव्यांना विरोध केला. कालवे झाले तर त्याचा फायदा तळेगाव भागास होईल व पिण्याचे पाणी कमी होईल म्हणून तळेगाव भागाला पाणी न मिळू देणाऱ्यांनी राहत्यातील पश्चिम भाग ही वंचित ठेवला.
या कालव्यांना शिर्डी संस्थानचा निधी दिला अशा घोषणा केल्या. त्यातील एक रुपया ही मिळाला नाही.आता ही १७०० कोटी मंजूर झाले म्हणता मग काम का होत नाही. मागील ४ वर्ष निधी देत नाही म्हणून ओरडणारे दोन महिन्यातच निधी देतो म्हणून सरकारचे गोडवे गात आहेत. पक्षबदल जनतेसाठी की सत्तेसाठी हा मोठा प्रश्न मतदारांपुढे पडला आहे.
- संगमनेरमध्ये सुरू झाली मोठी लढाई ! थोरात-खताळ लढाईचा नवा अध्याय
- Kia Sonet वर भन्नाट ऑफर ! 2 लाखांत कार तुमची… विश्वास बसणार नाही अशी ऑफर!
- आनंदाची बातमी ! 589 किमीचे मुंबई-गोवा अंतर आता फक्त 6 तासात कापले जाणार; रेल्वेने नाहीतर समुद्रमार्गे सुपरफास्ट प्रवास, कधी सुरु होणार जलवाहतूक ?
- Navpancham Rajyog : एप्रिलमध्ये घडणार मोठी घटना ! नवपंचम राजयोगाने 3 राशींचे नशीब बदलणार
- Vastu Tips | तुम्ही तुमच्या पर्समध्ये ‘या’ वस्तू ठेवल्यात तर 100% कर्जबाजारी व्हाल, कितीही कमवा पण हातात पैसा राहणार नाही