भाजपाचा बुरुज उद्ध्वस्त करण्यात पवारांना यश !

Published on -

कर्जत – जामखेडच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भाजपाचे विद्यमान आमदार तथा मंत्री ना.शिंदे विरुद्ध पवारांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होती. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

रथी-महारथींच्या सभा कर्जत-जामखेडला गाजल्या. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. रोहित पवारांनी तब्बल ४३ हजार ३४७ इतक्या मताधिक्क्यांनी ना.शिंदेंना पराभवाची धूळ चारली.

ना.शिंदे यांना ९२ हजार ४७७ तर पवार यांना १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळाली. कर्जत-जामखेडमध्ये रामराया राज्य संपुष्टात येवून रोहितपर्व सुरु झाले आहे. ना.शिंदे यांनी कर्जत-जामखेडमधून सलग दोनदा निवडणूक जिंकली होती.

विशेष म्हणजे कर्जत-जामखेड हा मतदारसंघ गेल्या २५ ते ३० वर्षांपासून भाजपाचा बालेकिल्ला होता. भाजपाचा बुरुज उद्ध्वस्त करण्यात राष्ट्रवादीच्या रोहित पवारांना यश आले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!